सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण: सीबीआयचा ‘क्लोजर रिपोर्ट’ सादर; रिया चक्रवर्तीसह आरोपींना ‘क्लीन चिट’

Sushant Singh Case Closer Report : आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे, धमकीचे किंवा चोरीचे पुरावे आढळले नाहीत; कुटुंबिय अहवालावर नाराज, न्यायालयात देणार आव्हान
मुंबई :- अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू Sushant Singh Murder प्रकरणाला एक महत्त्वाचे वळण मिळाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा समाप्ती अहवाल नुकताच सादर केला असून, यामध्ये अभिनेता रिया चक्रवर्ती आणि इतर सर्व आरोपींना ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे. Clean Cheat In Sushant Singh Murder बेकायदेशीर कोठडी, आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा चोरी यांसारख्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे तपासात आढळले नाहीत, असा स्पष्ट निष्कर्ष सीबीआयने दिला आहे. Sushant Singh Clean Cheat News
सीबीआयच्या तपासातील प्रमुख निष्कर्ष
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या सहकाऱ्यांवर विविध गंभीर आरोप केले होते. मात्र, सीबीआयच्या अहवालात खालील प्रमुख निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत:
आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे पुरावे नाहीत: सुशांतच्या मृत्यूशी संबंधित कोणत्याही आरोपी व्यक्तीकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे, मालमत्तेचा गैरवापर केल्याचे किंवा बेकायदेशीर ताब्यात ठेवल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नाहीत.
धमकीचे पुरावे नाहीत: रियाने सुशांतला धमकी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. अशा धमकीचे कोणतेही पुरावे डिजिटल किंवा इतर नोंदींमध्ये आढळले नाहीत.
आरोपींची अनुपस्थिती: 8 ते 14 जून 2020 या गंभीर काळात कोणताही आरोपी सुशांतसोबत राहिलेला नव्हता. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीसोबत 10 जून रोजी फक्त एक व्हॉट्सअॅप संभाषण झाले होते.
कुटुंबियांची उपस्थिती: सुशांतची मोठी बहीण मीतू सिंह 8 ते 12 जून 2020 या काळात त्याच्या सदनिकेत राहिली होती.
सुशांतचे कुटुंबिय नाराज; न्यायालयात आव्हान देणार:
सीबीआयने काढलेल्या या निष्कर्षाशी सुशांतचे कुटुंबीय पूर्णतः असहमत आहेत. सुशांतचे वकील वरुण सिंह यांनी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले:
“हा अहवाल म्हणजे केवळ एक देखावा आहे.”
“सीबीआयला खरोखर सत्य उघड करायचे असते, तर त्यांनी सर्व पुरावे (चॅट रेकॉर्ड, तांत्रिक तपशील, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल) न्यायालयात सादर केले असते. ही चौकशी अपूर्ण आणि कमकुवत आहे.”
सुशांतच्या कुटुंबीयांनी या अहवालावर नाराजी व्यक्त करत, त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पटना न्यायालयात या समाप्ती अहवालावर 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.



