Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव यांच्या मराठीतून मनोगत, मुंबई पोलीस सह मुख्यमंत्री यांचेही मानले आभार
Suryakumar Yadav Marathi speech : सूर्यकुमार यादव यांनी सर्वांचे मानले आभार
मुंबई :- विधान मंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये विश्व विजेते भारतीय संघाच्या मुंबईत असलेल्या खेळाडूंचे सरकारने अभिनंदन केले या कार्यक्रमात राज्याचे सर्व मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपसभापती, विधानसभा अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. भारतीय संघाचे मुंबईत राहणारे रोहित शर्मा, Rohit Sharma सूर्यकुमार यादव, Suryakumar Yadav यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे या चारी खेळाडूंचे राज्य सरकार मार्फत सत्कार करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी मराठीतून मनोगत व्यक्त करत जोरदार फटकेबाजी केली तर सूर्यकुमार यादव याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही संधी दिली. सर्वांना भेटून खूप चांगलं वाटत आहे. जे मी काल बघितलं ते मी कधी विसरु शकत नाही. तसेच मी इथेसुद्धा आज बघतोय, इथलेदेखील क्षण मी कधी विसरु शकत नाही. थँक्यू सो मच. मी काय म्हणू? माझे शब्द संपले आहेत. मला माहिती नाही, मला काय बोलायचं, थँक्यू सो मच”, अशा शब्दांत सूर्यकुमार यादव याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
“इकडे येऊन खूप चांगले वाटले. आमचे बीसीसीआयचे ट्रेझर आशिष शेलार हे सुद्धा काल आम्हाला घ्यायला आले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी जे काल बघितलं, आपल्या मुंबई पोलिसांनी जे काल केलंय, ते मला वाटत नाही की, कोणी असं करु शकतं. आम्हाला असंच प्रोत्साहन मिळेल, अशी आशा करतो. नंतर परत आपण अजून एक वर्ल्ड कप जिंकू”, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.