महाराष्ट्र

Suryakanta Patil : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी मंत्री सूर्यकांता पाटील आज शरद पवार गटात जाणार, काल राजीनामा दिला होता.

Suryakanta Patil Resigns From BJP : केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी 3 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत

नांदेड : भाजपला मोठा धक्का बसला असून माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील Suryakanta Patil यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांचा Sharad Pawar हात धरला आहे. आज पाटील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षप्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपचा राजीनामा दिला आहे.

गेल्या 10 वर्षात मी खूप काही शिकलो, मी पक्षाची ऋणी आहे, असे सांगत सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी सूर्यकांता पाटील यांनी भाजपकडे तिकीट मागितले होते, त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांनी राजीनामा दिला आहे.

सूर्यकांता पाटील यांनी हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे चार वेळा खासदार आणि एकदा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्या ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री होत्या. यानंतर त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयात राज्यमंत्रीपदही भूषवले.सूर्यकांता पाटील 1980 मध्ये हदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. सूर्यकांता पाटील 1986 मध्ये काँग्रेसमधून राज्यसभेवर गेल्या, 1991, 1998 आणि 2004 मध्ये त्या तीनदा लोकसभेवर निवडून गेल्या.

कोण आहेत सूर्यकांता पाटील?

  • 1970-1972 – जनसंघ नेत्या, भाजप महिला आघाडी प्रमुख.
  • 1974 नांदेड नगरपालिकेसाठी नांदेड काँग्रेसचे उमेदवार (8 वर्षे नगराध्यक्ष)
  • 1980 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर हदगाव विधानसभेची निवडणूक जिंकली.
  • 1980-1985 पर्यंत विधानसभेचे सदस्य.
  • 1986 राजीव गांधी त्यांना राज्यसभेवर घेऊन गेले.
  • 1991 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून नांदेड लोकसभा विक्रमी 1 लाख 37 हजार मतांनी जिंकली.
  • 1996 मध्ये हिंगोलीत काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
  • 1999 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.
  • 1998 मध्ये हिंगोलीत राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
  • 2004 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा सदस्य.
  • 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला.
  • 2014 पर्यंत राष्ट्रवादीत राहिले.
  • 2014 मध्ये काँग्रेसने राजीव सातव यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Suryakanta Patil : Big blow to BJP before assembly elections, former minister Suryakanta Patil will join Sharad Pawar group today, he had resigned yesterday.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0