महाराष्ट्र

Suresh Sonawane : अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर हल्ला, दगडफेकीत जखमी

Gangapur Vidhan Sabha Election: गंगापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली असून, त्यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुंबई :- सोमवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर विधानसभा Gangapur Vidhan Sabha मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे Suresh Sonawane यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. सायंकाळी 7.30 वाजता घडलेल्या या घटनेत सोनवणे यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.वाळूज पोलीस ठाण्याच्या Walunj Police Station हद्दीतील लांजी गावाजवळ सोनवणे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बागटे यांनी पत्रकारांना दिली. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटनेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटनाही समोर आली आहे. गाडीवर दगडफेक केल्याने अनिल देशमुखही जखमी झाले. डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा हल्ला कोणी केला याबाबत माहिती मिळू शकली नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सोमवारी शेवटचा दिवस होता. सायंकाळी पाच वाजता प्रचार संपल्यानंतर माजी गृहराज्यमंत्री काटोलहून नागपूर शहरात परतत होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला केला.

अनिल देशमुख मागच्या सीटवर बसले होते. यावेळी कारची काच उघडी असल्याने त्यांच्या डोक्यात दगड लागल्याने त्यांना रक्तस्त्राव सुरू झाला. देशमुख यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दोन दिवसांपूर्वी जनसुराज्य शक्ती पक्षाचे करवीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटनाही समोर आली होती. त्यांची गाडी थांबवून दगडफेक करण्यात आली, त्यामुळे त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली असून रात्रीच्या अंधारात हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर घोरपडे यांना रुग्णालयात नेण्यात आले.त्यांच्या तक्रारीवरून काळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0