Suraj Chavan : ठाकरे गटाला मोठा दिलासा, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना जामीन मंजूर
Suraj Chavan : मुंबई उच्च न्यायालयाकडून सुरज चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे. सुरज चव्हाण यांच्यावर कोविड-19 मध्ये खिचडी घोटाळा केल्याचा आरोप
मुंबई :- आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून ओळखले जाणारे आणि आदित्य ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय सुरज चव्हाण Suraj Chavan यांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सुरज चव्हाण यांना जामीन मंजूर केल्याने त्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे. कोविड-19 मध्ये खिचडी घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि त्यानंतर या प्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर खिचडी घोटाळ्याप्रकरणी 17 जानेवारी 2024 रोजी सुरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती.
कोविडच्या महामारीमुळे लोक डाऊन लागल्यानंतर स्थलांतरित लोकांना राज्य सरकारकडून आणि महानगरपालिका कडून वाटप करण्यात आलेले खिचडी यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सुरज चव्हाण यांच्यावर करण्यात आले होते. सुरज चव्हाण शिवसेना नेते आणि तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि सचिव म्हणून काम पाहत होते. सुरज चव्हाण यांच्या अटकेनंतर जवळपास 90 लाख रुपयांची मालमत्ता ईडी कडून जप्त करण्यात आली होती. मुंबईतील फ्लॅट आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भुखंड याचा देखील समावेश या कारवाईमध्ये करण्यात आला होता.खिचडी घोटाळ्याप्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी सूरज चव्हाण यांची चौकशी केली होती. या पाठोपाठ ईडीने त्यांना चौकशीचे समन्स बजावले. ईडीने त्यांना अनेक तास आपल्या कार्यालयात बसवून ठेवले. त्यांचा जबाब नोंदवला होता. तसेच, त्यांच्या चेंबूर येथील घरीही ईडीने धाड टाकली होती.
किरीट सोमय्या यांचे आरोप?
मुंबई महापालिकेने लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट या कंपनीला कोरोना काळात कोविड सेंटरचे कंत्राट दिले होते.या कंपनीला या आधीचा कोणताही अनुभव नसताना आणि त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळही नसताना हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंपनीने बनावट कागदपत्रे दाखवून हे कंत्राट मिळवले होते. त्यात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप या कंपनीवर करण्यात आला आहे. त्यामध्ये संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.