क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mumbai Crime News : ‘रिल्स’ पाहत असताना मोबाईल हिसकावला… शिवडीतील स्नॅचरचा ‘The End’!

Mumbai Police Latest Crime News : हेल्मेटखाली लपलेला चेहरा उघड; केवळ 8 दिवसांत शिवडी पोलिसांची कामगिरी,गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरीचा मोबाईल पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | गर्दीच्या रस्त्यावर चालताना इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असलेल्या तरुणाचा मोबाईल भरधाव वेगात आलेल्या बाईकस्वाराने हिसकावला… आणि क्षणार्धात गायब झाला. पण गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी शिवडी पोलिसांच्या Mumbai Shewri Police News सखोल तपासातून तो अखेर जाळ्यात सापडलाच! Mumbai Police Latest Crime News

5 जून रोजी सायंकाळी 7.40 वाजता रे रोड ब्रिज परिसरात ही घटना घडली. प्रिन्स श्रीमंडल कुमार (21 वय) हा युवक आपल्या मोबाईलवर रिल्स पाहत चालत असताना पांढऱ्या हेल्मेटमधून आलेल्या बाईकस्वाराने त्याच्या हातातील मोबाईल अक्षरशः झडप घालून पळ काढला. याबाबत शिवडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी भा.दं.सं. कलम 304(2) अंतर्गत अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काळेकर, खुळे व पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही, गुप्त माहितीदार व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित सुफियान ईस्माईल मन्सुरी (27 वय) याला ओळखले.

शिवडी गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याला सर जे.जे. मार्ग पोलीस ठाणे हद्दीतून सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

Deven Bharti

पोलीस आयुक्त देवेन भारती, Mumbai CP Deven Bharti सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख (दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई), पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर (बंदर परिमंडळ, मुंबई), सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे (वडाळा विभाग, मुंबई), वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत (शिवडी पोलीस ठाणे, मुंबई), पोलीस निरीक्षक दिलीप मसराम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहलसिंह खुळे, पोलीस हवालदार गायकवाड, कदम, यादव, आडोळे, साळेकर, पोलीस शिपाई शेख, साताळकर, जमादार, घाडगे,माळोदे, लाड, राठोड यांनी कारवाई केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0