Supriya Sule News : सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांचे मानले आभार..
Supriya Sule : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी बारामतीकरांचे आभार व्यक्त केले
पुणे :- बारामती लोकसभा Baramati Lok Sabha Election मतदानाच्या दिवशी बारामती मध्ये मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला एका बाजूला गृहीत पवार हे सातत्याने काका अजित पवार Ajit Pawar यांच्यावर व्हिडिओ आणि इतरत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत होते तर दुसरीकडे सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी मतदानानंतर अजित पवार यांच्या मातोश्री योग्य घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेतला शरद पवार यांनी अनेक वर्षांनंतर बारामती मध्ये लेखी करिता मतदान केले अनेक केंद्राच्या बाहेर पैसे वाटप करण्याचा कथित व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडून शेअर होतो ते या सगळ्या घडामोडीनंतर आता सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांचे आभार व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळे यांनी पत्र बारामतीकरांना आभार व्यक्त केले आहे. राज्यात 11 जागे करिता झालेल्या मतदानात सर्वात कमी टक्के हा बारामतीत झालेला आहे.
सुप्रिया सुळे आपल्या पत्रात म्हणाले की,भारतीय लोकशाही व्यवस्थेचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीत आपण सर्वांनी सक्रियपणे सहभाग घेत आपले मत नोंदविले याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. आपण सेवा, सन्मान, स्वाभिमान या त्रिसुत्रीचा सन्मान करीत ‘तुतारी वाजविणारा माणूस’ या निशाणीलाच पसंती दिली असणार याची मला खात्री आहे. आपल्या या भरघोस प्रतिसादाबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. Baramati Lok Sabha Election Latest News
याशिवाय बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहिर झाल्यापासून महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांनी अतिशय जोमाने एकही दिवस विश्रांती न घेता प्रचाराच्या कामात झोकून दिले. स्थानिक भेटी, दौरे, प्रचारसभा आदी सर्व प्रकारच्या कामांमध्ये हे सर्वजण मनःपूर्वक सहभागी झाले. महत्वाची गोष्ट म्हणजे, या निवडणूकीत आपले चिन्ह नवे होते तरी ते प्रत्येक मतदारापर्यंत घेऊन जाण्यात आणि निवडणूक लढविण्यामागची आपली भूमिका जनतेपुढे मांडण्यात सर्वांनी एक टिम म्हणून जी मेहनत घेतली ती खुप मोलाची आहे. याबद्दल मी आपणा सर्वांची अतिशय आभारी आहे. Baramati Lok Sabha Election Latest News
मतदानाची ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा, पत्रकार यांनीही अतिशय मोलाचे काम बजावले आहे. याबद्दल त्यांचेही आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्याखेरीज भारतीय लोकशाहीचा हा अमूल्य उत्सव साजरा होणे अशक्य होते.धन्यवाद… ननंद भावजय यांच्यात लढत असून येणाऱ्या चार जूनला कोणाचा विजय होईल हे पाहणे उत्सुकताचे ठरणार आहे. Baramati Lok Sabha Election Latest News