पुणे

Supriya Sule : पुण्यात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची गरज; खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Supriya Sule : पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या सोयीसाठी खंडपीठ आवश्यक; ‘Justice delayed is justice denied’ चा मुद्दा उपस्थित

पुणे :- पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळावा यासाठी पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करणे आवश्यक आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवून या खंडपीठाची गरज का आहे, याची सविस्तर कारणे दिली आहेत. Pune Latest News

सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या पुणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील इंदापूर तालुक्यापासून मुंबई उच्च न्यायालयाचे अंतर सुमारे 350 किलोमीटर आहे. हे लांबचे अंतर पार करताना सामान्य नागरिक, वकील आणि साक्षीदारांना वेळखाऊ, खर्चिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे, ‘Justice delayed is justice denied’ (विलंबित न्याय म्हणजे न्याय नाकारणे) या तत्त्वाला बाधा येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये शासनाने नुकत्याच कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला मंजुरी दिल्याबद्दल स्वागत केले आहे. त्याच धर्तीवर आता पुण्यातही खंडपीठ स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पुणे हे शिक्षण, प्रशिक्षण आणि प्रशासनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथील बार असोसिएशननेही सातत्याने ही मागणी शासनाकडे लावून धरली आहे.

पुणे शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या आणि प्रलंबित खटल्यांची मोठी संख्या पाहता, या खंडपीठाची आवश्यकता स्पष्ट होते, असे सुळे यांनी म्हटले आहे. या सर्व बाबींचा विचार करून पुणे खंडपीठाच्या स्थापनेला तातडीने मंजुरी द्यावी, अशी नम्र विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यांच्या या मागणीकडे आता सरकार कसे पाहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0