Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती
Supriya Sule On Devendra Fadnavis : राज्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने माझी सुरक्षा काढून घ्या ; खा. सुप्रिया सुळे
मुंबई :- बदलापूर घटनेनंतर Badlapur School Case राज्यात चांगले पडसाद उमटले आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. पोलीस यंत्रणाचा अपुरी पडत असल्याने राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना सुरक्षा काढून घेण्याबाबत विनंती केली आहे. सुप्रिया सुळे एचडी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत सुरक्षा काढून घेण्याची विनंती केली आहे. तसेच पुणे मध्ये आजी-माजी नेत्यांचेही सुरक्षा कमी करावी अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गेली काही महिन्यांपासून अतिशय गंभीर आहे. जनता असुरक्षित वातावरणात जगत असून सततच्या अप्रिय घटनांमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण आहे. महिला, अबालवृद्ध कुणीही सुरक्षित नाहीत. गुन्हेगार निर्वावले असून कायद्याचा धाक उरलेला नाही. यंत्रणा राबविताना पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडतोय, हे स्पष्टपणे दिसत आहे.
दुसरीकडे माझ्यासह अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस यंत्रणा काम करत आहे. परंतु एका बाजूला कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणेचं बळ कमी पडत असताना दुसरीकडे हि सुरक्षा घेणं योग्य नाही. म्हणून गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कृपया माझ्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा तातडीने काढून घ्यावी. माझ्या सुरक्षेसाठी दिलेले हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेसाठी नियुक्त करावेत.
यासोबतच राज्यातील ज्यांना ज्यांना सुरक्षा व्यवस्था दिली आहे त्या सर्वांच्या सुरक्षेच्या गरजेबाबत तातडीने आढावा घ्यावा व ज्यांना गरज नाही, त्यांची सुरक्षा काढून ते पोलीस कर्मचारी जनतेच्या सुरक्षेसाठी देण्यात यावे.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख राहावी व जनतेला सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी गृहमंत्र्यांनी हा निर्णय तातडीने घ्यावा ही नम्र विनंती.