मुंबई

Supriya Sule : हिम्मत असेल तर कार्यक्रमाला न जाणारा बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या महिलांचा फॉर्म रद्द करण्याची धमकी सुप्रिया सुळे यांनी धमकीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत विचारला जाब

मुंबई :- राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राजकीय वातावरण जरी तापले असले तरी राज्यात मोठ्या प्रमाणावर महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. तू आता याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांकमध्ये जुगलबंदी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात गैरहजर राहणाऱ्या महिलांचा फॉर्म रद्द करण्याच्या धमकीचा मेसेज चा स्क्रीनशॉट ट्विटकरत सरकारला इशारा दिला आहे. सुप्रिया सुळे म्हणाले हिम्मत असेल तर एकातरी लाडक्या बहिणीचा फॉर्म रद्द करून दाखवा. गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे.

सुप्रिया सुळे यांनी केलेले ट्विट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत… बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार… अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच.

स्क्रीन शॉट मध्ये काय मेसेज आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदाकरणाच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी ज्या महिलांनी हा फॉर्म भरला आहे व त्याचे approved मेसेज आला आहे त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे यासाठी पुणे महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर बचत गट हॉल सुखसागर पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे तसेच अल्पोपहाराची पण व्यवस्था केलेली आहे शनिवारी सकाळी 9.30 वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी येथून बसची सोय केलेली आहे या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे सर्वांनी येणे आवश्यक आहे ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0