पुणे

Supriya Sule : ससून रुग्णालयाच्या पाच वर्षाच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका सादर करावी.. सुप्रिया सुळे यांची मागणी

•राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या Supriya Sule यांनी ससून रुग्णालयाबाबत श्वेतपत्रिका सादर करावे अशी मागणी केली आहे

पुणे :- कल्याणीनगर‌ हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी एसटी स्थापन केली आहे. पोलिसांनी यापूर्वीच अल्पवयीन मुलाला अटक केली असून मुलाचे आजोबा आणि वडील यांना या अटक केली आहे.या प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकरण समोर आले असून पोलिसांनी राजकीय सोबतच गुन्हेगारी क्षेत्रातही अग्रवाल कुटुंबाचा संबंध असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आणि प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक केली आहे. या सर्व प्रकरणात ससून रुग्णालयाचे दोन डॉक्टर हे सहभागी असल्यामुळे पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेत्या सुप्रिया सुळे यांनी आता ससून रुग्णालयाचे पाच वर्षातील कामकाजाबाबत श्वेतपत्रिका सादर करावी अशी मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांची मागणी
पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेली काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. तर आता कल्याणीनगर ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी दोन वरीष्ठ डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हवे. वास्तविक पाहता ससून रुग्णालय हे उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी ओळखले जाते. कोरोना काळात देखील येथे उत्तम सेवा उपलब्ध झाली होती. ससूनमध्ये तज्ज्ञ, अभ्यासू आणि अनुभवी डॉक्टर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाचे उपचार गरजू व गरीब रुग्णांना मिळतात. याखेरीज परिचारिका व सपोर्टींग स्टाफचे देखील सहकार्य लाभते.शिवाय अनेक नामांकित डॉक्टर येथून शिकून गेले आहेत. परंतु गेल्या काही दिवसांच्या घटनाक्रमानंतर आणि डॉक्टरांच्या अटकेनंतर त्यांच्यावर देखील शंका घेतली जात आहे. काही लोकांनी गैरकृत्य केले असेल तर त्यामुळे इतरांकडेही संशयाने पाहिले जाणे योग्य नाही. तसेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणे आवश्यक आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की, आपण ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0