Sunil Raut On CM Eknath Shinde : लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं….. आमदार सुनील राऊत
मुंबई :- “मी लंडनला जाऊ शकत नाही, मला काम राज्यात करावे लागते” असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. यावरूनच ठाकरे गटाने आता हल्ला चढवला आहे.लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं. तिथे जाऊन मुख्यमंत्री काय मराठी हिंदीमध्ये बोलणार का? असे म्हणत ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत (Sunil Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी मुख्यमंत्र्यांची गत झाली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.
40 गद्दार आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सुनील राऊत म्हणाले, “लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावे लागते. तिथे जाऊन मुख्यमंत्री काय मराठी हिंदीमध्ये बोलणार का?. ‘नाचता येईना अंगण वाकडं’ अशी मुख्यमंत्र्यांची गत झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून जर ते लंडनला गेले तरी ते असलेल्या 40 गद्दार आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल आणि फटाफूट होईल, हे त्यांना चांगलेच माहिती आहे. म्हणून ते लंडनला जात नाहीत”, असे सुनील राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीच्या राज्यात 37 जागा तसेच राज्यात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार याबाबत त्यांनी विधान केले आहे. “सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना महाराष्ट्र मध्ये प्रचंड सहानुभूती आहे. त्यामुळे आमच्या 37 जागा महाराष्ट्रामध्ये येथील असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडी मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये जिंकेल”, असा दावा आमदार सुनील राऊत यांनी केला आहे.
अमोल कीर्तिकर यांच्यावर कुठलीही कारवाई झाली तरी देखील गजानन कीर्तिकर यांना काही फरक पडणार नाही. त्यांनी मुलाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे अमोल कीर्तीकर हे खासदार नक्कीच होतील”, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला.
मराठी माणसावर अन्याय केला, सेना फोडली यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीकाही केली आहे. “लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मिहीर कोटेचा यांचा पराभव होणार आहे. किरीट सोमय्या यांनी मराठी माणसावर अन्याय केला, सेना फोडली, गद्दारी करायला लावली याचा देखील राग लोकांच्या मनात होता. संजय पाटील यांच्या विरोधात मोदींना रस्त्यावर रोड शो करायला लागला याचाच अर्थ त्यांच्या उमेदवार हा शंभर टक्के पडणार आहे”, असा टोला आमदार सुनील राऊत यांनी लगावला.
तसेच लोकसभा निकालानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत, महाराष्ट्र ठरवेल की पंतप्रधान कोण होईल, असेही ते म्हणाले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…