•अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची भावनिक कसोटी; 12 जिल्हा परिषदांसाठी राज्यात आज मतदान
बारामती | राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर बारामती तालुका आज पहिल्यांदाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. अजितदादांच्या अनुपस्थितीतही त्यांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांची ‘सकाळी लवकर मतदान करण्याची’ परंपरा कायम ठेवली. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होताच सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आपला हक्क बजावला.
पवार कुटुंबाचे मतदान
काटेवाडी: सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सकाळीच मतदान केले.
कन्हेरी: युगेंद्र पवार, शर्मिला पवार आणि राजेंद्र पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.
पिंपळी: आमदार रोहित पवार यांनी पत्नी कुंती आणि कुटुंबीयांसह मतदान केले.
नोंद: शरद पवार यांचे मतदान माळेगाव नगरपरिषदेत आणि सुप्रिया सुळे यांचे मतदान बारामती नगरपालिकेत असल्याने, केवळ जिल्हा परिषद क्षेत्रातील सदस्यांनीच आज मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.
भावूक वातावरण आणि प्रचाराचा रोख
अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनामुळे पुणे जिल्ह्यात प्रचाराचे स्वरूप पूर्णपणे बदलले होते. जाहीर सभांऐवजी उमेदवारांनी वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला. राष्ट्रवादीच्या प्रचारात “दादांना खरी श्रद्धांजली” असा भावनिक सूर उमटताना दिसला. त्यामुळे या निवडणुकीत विकासकामांपेक्षा ‘सहानुभूती’ किती प्रभावी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
निवडणुकीचे महत्त्व आणि समीकरणे
ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतरची महत्त्वाची परीक्षा आहे. पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 6 जागा आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी बारामतीत मोठी चुरस आहे. अजित पवार यांचे निधन निवडणुकीच्या ऐन धामधुमीत झाल्याने, मतदारांचा कौल कोणाकडे जातो यावर दोन्ही राष्ट्रवादीच्या भविष्यातील शक्तीप्रदर्शनाचे चित्र अवलंबून आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…