Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड
•राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांची निवड राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे
मुंबई :- बारामती लोकसभेत पराभव मिळाल्यानंतर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेच्या प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर उमेदवारी देण्यात आली होती. सुमित्रा पवार यांनी 13 जून रोजी भरलेल्या अर्जा नंतर तिथे कोणीही अधिकृतपणे अर्ज भरला नाही तेव्हाच त्यांचा विजय झाल्याचा निश्चित झालं होते. परंतु काल विधिमंडळाच्या सचिवालयात सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
सुनेत्रा पवार या एकमेव उमेदवार रिंगणात असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानले जात होते. पुण्यात त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होती की, जर केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळाल्यास स्वीकारणार का? यावर त्या म्हणाल्या होत्या की, मला संधी मिळाली तर मी नक्कीच संधीचा फायदा घेईन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोधी निवड झाली आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची ऑफर आल्यास ती आनंदाने स्वीकारू, असे त्यांनी याआधीच सांगितले. सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून देखील लोकसभा निवडणूक लढवली होती. पण सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी राज्यातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.