Sunetra Pawar : सुनेत्रा पवार बारामतीच्या मोदी बागेत दाखल, शरद पवार सुप्रिया सुळे यांचे भेट घेतली?
•राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी मुंबई शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्यानंतर अजित पवार यांची पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी शरद पवार चे भेट ?
पुणे :- सोमवारी (15 जुलै) अचानक सिल्वर ओक वर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता शरद पवारांच्या सून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या खासदार व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या मोदी बागेत जाऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याचे चर्चा आहे.
आज शरद पवार, सुप्रिया सुळे मोदीबागेतील निवासस्थानी असताना सुनेत्रा पवार देखील मोदी बागेमध्ये दाखल झाल्या होत्या. तब्बल तासभर सुनेत्रा पवार तिथे होत्या. मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांनी कोणाची भेट घेतली याबाबत उत्सुकता आहेत. जवळपास तासभर तिथे थांबल्यानंतर सुनेत्रा पवार तेथून रवाना झाल्या. यावेळी त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट घेतली का? याबद्दल चर्चा रंगली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार अजित पवारांच्या बहिणीला भेटण्यासाठी आल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.