महाराष्ट्र

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार बनल्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; पदभार स्वीकारताच अजितदादांच्या स्वप्नपूर्तीचे दिले वचन

DCM Sunetra Pawar : रोहित पवारांच्या शुभेच्छांमध्ये दडला ‘राजकीय बाण’; “काही नेत्यांची इच्छा नसली तरी सुनेत्राकाकींनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे”, तटकरे-पटेलांना टोला

मुंबई | महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली असून, आज त्यांनी मंत्रालयात आपल्या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. राज्याच्या इतिहासात उपमुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. मात्र, त्यांच्या या पदभार स्वीकृती सोहळ्यापेक्षा आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानाचीच राजकीय वर्तुळात जास्त चर्चा रंगली आहे.

सुनेत्रा पवारांची भावूक प्रतिक्रिया: “दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही”

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.

दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल.

दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन.

रोहित पवारांचे ‘ट्विट’ आणि अंतर्गत संघर्षाचे संकेत

सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा देताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष केले आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले,

“उपमुख्यमंत्री पदासह सुनेत्राकाकींनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही लवकरच विराजमान व्हावं. ही काही नेत्यांची (सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे इशारा) इच्छा नसली, तरी राज्यभरातील लाखो कार्यकर्त्यांची हीच अपेक्षा आहे.”

रोहित पवारांच्या या विधानामुळे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना डावलून पक्षाची धुरा सुनेत्रा पवारांकडे द्यावी, अशी मागणी करून रोहित पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांना पेचात टाकले आहे.

*

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago