मुंबईठाणे
Trending

Sunetra Pawar : ‘प्रीतिसंगमा’वर वहिनी नतमस्तक! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतले स्व. यशवंतराव चव्हाणांचे आशीर्वाद

DCM Sunetra Pawar At Karad : ‘दादां’च्या जनसेवेचा वारसा जपण्याचा संकल्प

कराड | महाराष्ट्राच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार Sunetra Pawar यांनी आज कराड येथील पवित्र प्रीतिसंगमावर जाऊन राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि ‘महाराष्ट्र धर्मा’चे अध्वर्यू स्व. यशवंतराव चव्हाण Yashwantrao Chavan यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा असून, दिवंगत अजित पवार यांच्या राजकारणाचे ऊर्जास्थान असलेल्या या पावन भूमीत त्यांनी दादांच्या लोकाभिमुख समाजकारणाची प्रेरणा पुन्हा एकदा जागृत केली.

महाराष्ट्र धर्माचे स्मरण आणि अभिवादन

महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत यशवंतराव चव्हाण साहेबांचे योगदान अथांग आहे. सुनेत्रावहिनींनी यावेळी साहेबांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. “चव्हाण साहेबांनी लोकहित, लोककल्याण आणि लोकसन्मानाचा जो आदर्श घालून दिला, तोच आमचा महाराष्ट्रधर्म आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. अजितदादांनी आपल्या संपूर्ण राजकीय प्रवासात यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना सर्वोच्च स्थान दिले होते, तोच वारसा आता सुनेत्रावहिनी पुढे नेत असल्याचे या भेटीतून अधोरेखित झाले.

अजितदादांच्या आठवणीने वातावरण भावूक

कराडमधील या स्मृतिस्थळावर अजितदादा नेहमी नतमस्तक व्हायचे. आज दादांच्या अनुपस्थितीत सुनेत्रावहिनींना पाहून उपस्थित कार्यकर्ते आणि बारामतीमधील नागरिक भावूक झाले होते. दादांची प्रशासकीय शिस्त आणि सामान्यांच्या कामाचा झपाटा ही चव्हाण साहेबांच्याच विचारांची देण होती, याचे स्मरण करत वहिनींनी आगामी काळात लोककल्याणासाठी झटण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0