Sunetra Pawar Latest News : उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचे पहिलेच भाषण; शिवरायांच्या जन्मभूमीत दिला शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा शब्द
किल्ले शिवनेरी | “मी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ज्या कठीण प्रसंगात मी ही शपथ घेतली, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर केवळ राजमाता जिजाऊ माँसाहेब होत्या,” असे उद्गार काढताना राज्याच्या नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज शिवनेरी किल्ल्यावर भावूक झाल्या होत्या. उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांचे हे पहिलेच सार्वजनिक भाषण होते.
जबाबदारीची जाणीव आणि अंगावर शहारा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर आयोजित शासकीय सोहळ्यात त्या बोलत होत्या. “यापूर्वी अनेकदा मी शिवनेरीवर आले आहे, पण आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत वेगळा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. या जन्मभूमीत उभे राहून बोलताना माझ्या अंगावर काटा येत आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
जिजाऊ माँसाहेब: प्रेरणेचा आधारवड
जिजाऊ माँसाहेबांच्या कार्याचे स्मरण करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “माँसाहेबांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर त्यांना स्वराज्याचा ध्यास दिला आणि अन्यायाविरुद्ध दोन हात करण्याची जिद्द दिली. त्याच माँसाहेब आजही आपली प्रेरणा आणि आधार आहेत.” आपण सर्वजण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अजितदादांचा वारसा आणि शिवजयंतीची शपथ
राजकीय वाटचालीबद्दल बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत एक महत्त्वाचा शब्द दिला. त्या म्हणाल्या, “आदरणीय दादांनी आयुष्यभर ज्या शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांनी वाटचाल केली, तो वारसा मी कधीही सोडणार नाही. हा शब्द मी आज शिवजयंतीच्या साक्षीने या पवित्र भूमीवर देत आहे.”
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन केली आणि शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो सुशासनाचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे सांगितले. त्यांच्या या पहिल्याच भाषणामुळे राजकीय वर्तुळात आणि उपस्थित शिवभक्तांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…