Sunetra Pawar In RSS Meeting : उपस्थितीवरून राजकीय वर्तुळात चर्चा; सुनेत्रा पवार यांनी दिले स्पष्टीकरण
मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमाचा फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही यावर खोचक टोला लगावला आहे.
रोहित पवार यांनी अजित पवारांच्या उपस्थितीवर निशाणा साधताना म्हटले की, “जेव्हा ओबीसी आरक्षण दिले गेले होते, तेव्हा कमंडल यात्रा काय होती, हे त्यांनी आरएसएसच्या प्रमुखांना विचारायला हवे होते.” तसेच, अजित पवारांवर काहीतरी दबाव असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
या टीकेनंतर खासदार सुनेत्रा पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्या एका मीटिंगमधील उपस्थितीबाबत जी चर्चा सुरू आहे, त्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी झाल्या होत्या.”
त्या पुढे म्हणाल्या, “राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असल्यामुळे मला विविध महिला संघटनांच्या कामाची माहिती घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्यावेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दांत माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये.”
सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, “समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील.” यामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…