मुंबई

Sunday MegaBlock News : रविवारचा प्रवास करण्यापूर्वी वाचा! मध्य रेल्वेच्या मुख्य, ट्रान्सहार्बर मार्गासह पश्चिम रेल्वेवरही ‘मेगाब्लॉक’

Mumbai Sunday MegaBlock News : ठाणे, वाशी, नेरुळ मार्गावरील लोकल रद्द; फास्ट मार्गावर वळवलेल्या गाड्यांमुळे मुख्य सेवेवर परिणाम,चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या प्रवासात बदल; पश्चिम रेल्वेवर धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर

मुंबई :- मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी (28 सप्टेंबर 2025) दिवसभर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत होणार असल्याने प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. Mumbai Latest Train Update

मध्य रेल्वेचा मुख्य मार्गावरील मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान मुख्य मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर सकाळी 8.00 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी, रविवारी जलद मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द

मध्य रेल्वेच्या ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. यामुळे ठाणे आणि वाशी/नेरूळ/पनवेल स्थानकांदरम्यान अप व डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहणार आहेत. ठाणे स्थानकातून पनवेल/नेरूळ/वाशीकडे जाणारी शेवटची लोकल सकाळी 10.35 वाजता सुटेल, तर पनवेल/नेरूळ/वाशी येथून ठाण्याकडे येणारी शेवटची लोकल सकाळी 10.25 वाजता सुटेल.

पश्चिम रेल्वेवरही दिवसभर ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरही रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत दिवसकालीन ब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यानच्या सर्व धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी, काही उपनगरीय रेल्वे सेवा पूर्णपणे रद्द केल्या जातील, तर काही लोकल गाड्या वांद्रे/दादर स्थानकांवर अंशतः रद्द होतील. प्रवाशांनी होणारी गैरसोय लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन दोन्ही रेल्वे प्रशासनाने केले आहे.

vivek

Recent Posts