Panvel Bribe News : पनवेलचा ‘खाकी’ खाक्यात! लाच घेताना पनवेलचा पोलीस उपनिरीक्षक रंगेहाथ गजाआड!

•Panvel Police Sub-Inspector caught red-handed while taking bribe वडिलांना अटक टाळण्यासाठी 1 लाखाची मागणी; 50 हजार घेताच एसीबीने रंगेहाथ पकडलं!
पनवेल :- पनवेल शहरात खाकीचा धसका बसावा अशी कारवाई रविवारी रात्री उरण नाका परिसरात पार पडली! पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेला सचिन वामन वाईकर याला तब्बल 50 हजारांची लाच घेताना ॲन्टी करप्शन ब्युरो (ACB) रायगडने रंगेहाथ पकडले. Panvel Bribe News लाचखोरीचा ‘डील’ एमएसईबी कार्यालयाजवळ वॅगन आर गाडीत सुरू असतानाच सापळा पडला!
तक्रारदाराचे वडील पनवेल शहर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात आरोपी होते. त्या प्रकरणात अधिक गुन्हेगारी कलमं लावून, जामीन नाकारण्याची आणि अटक करण्याची धमकी देत उपनिरीक्षक वाईकरने सुरुवातीला 1 लाख रुपयांची मागणी केली होती.
‘डील’ कारमध्ये, ‘डाव’ एसीबीचा — पोलीस उपनिरीक्षकासह खाजगी इसमही गजाआड
पडताळणी दरम्यान एसीबीच्या ACB पथकाने साक्षीदारांसमक्ष व्यवहार टिपून ठेवला आणि तडजोडीने 50 हजार स्वीकारताना आरोपीला कारमध्येच झडप घालून पकडलं. खाजगी इसम रविंद्र उर्फ सचिन बुट्टे याच्या हाती लाच स्वीकारून पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशाने रक्कम घेतली जात होती. Panvel Bribe News
कारवाईचा थरार शिवाजी चौक, जुना पनवेल येथे रात्रीच्या सुमारास घडला. पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, उप अधीक्षक सरिता भोसले, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही अचूक आणि धाडसी कारवाई पार पडली.


