मुंबई

Sunday MegaBlock News : रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक; प्रवाशांनी वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे

Sunday Latest MegaBlock News : करी रोड-चिंचपोकळीचा लोकल थांबा रद्द; हार्बरवर कुर्ला-वाशी दरम्यान सेवा ठप्प

मुंबई :- मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी (दि. 2 नोव्हेंबर 2025) विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे लोकल वेळापत्रकात बदल होणार असून, प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे. Sunday Latest MegaBlock News

मध्य रेल्वे
मुख्य मार्ग (CSMT – विद्याविहार)
सीएसएमटी – विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे.डाऊन धीमा मार्ग: सीएसएमटीहून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सीएसएमटी – विद्याविहारदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील.

अप धीमा मार्ग: घाटकोपरहून सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल विद्याविहार – सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.

विशेष सूचना: करी रोड आणि चिंचपोकळी (जुळी स्थानके) या स्थानकांवरील लोकल थांबा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आला आहे.

हार्बर मार्ग (कुर्ला – वाशी)

कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक असून दरम्यान सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल, तसेच पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 या वेळेत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

विशेष लोकल: ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी या विभागांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.

प्रवासाची परवानगी: हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ठाणे – वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वे

चर्चगेट – मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगा ब्लॉक असून जलद लोकल: ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट – मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. ब्लॉक काळात काही चर्चगेट लोकल वांद्रे / दादर स्थानकादरम्यान अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago