Sunday Mega Block : रविवारी 30 जून रेल्वेचा मेगाब्लॉक, मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे सेवेवर परिणाम
•मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे ट्रॅक आणि सिग्नल्सची देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल उशिराने धावणार आहेत.
मुंबई :- रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते जेणेकरून आठवड्याच्या उर्वरित काळात प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये. रविवार, 30 जून रोजी मध्य रेल्वेने ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर आणि पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे.
पश्चिम रेल्वेने बोरिवली ते राम मंदिर स्थानकादरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात रेल्वे रुळ आणि सिग्नल्सची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल उशिराने धावणार आहेत. त्यामुळे वेळापत्रक पाहूनच निघावे. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 पर्यंत ब्लॉक असेल. पनवेल ते वाशी दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
बोरीवली स्थानक ते राम मंदिर स्थानकादरम्यान सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ब्लॉक असेल, या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप-डाऊन लोकल रद्द राहतील. वाशी, ठाणे ते वाशी, नेरुळ, बेलापूर-नेरुळ आणि उरण दरम्यान सीएसएमटी स्थानकावरून लोकल सोडण्यात येणार आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी प्रवाशांनी वेळापत्रक पाहून आपले नियोजन करावे.