Sunday Mega Block : रविवारी (25 ऑगस्ट) मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक,लोकल सेवेवर परिणाम होणार !

•अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक
मुंबई :- रविवारी (25 ऑगस्ट) मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक असेल. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. मुंबईकरांनी रविवारी घराबाहेर पडताना एकदा रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच रेल्वेने प्रवास करा.
मध्य रेल्वे मेगाब्लॉक कसा असणार आहे
माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत असणार आहे.ब्लॉक कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.लोकल पंधरा ते वीस मिनिटांच्या उशिराने धावणार आहे.
हार्बर मार्गावर कशाप्रकारे असणार आहे मेगाब्लॉक
पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल/वाशी/बेलापूर अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद राहील. तर, सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असतील. बेलापूर-नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका सेवा उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक कशाप्रकारे असणार आहे
बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर, काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. यासह हार्बर मार्गावरील अंधेरी – बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक 1,2,3 आणि 4 वरून कोणतीही लोकल सेवा धावणार नाही.