मुंबई

Sunday Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; लोकलचे वेळापत्रक कोलमडणार!

•मुलुंड-ठाणे दरम्यान तांत्रिक कामासाठी ब्लॉक | पनवेल-वाशी हार्बर मार्ग राहणार बंद

मुंबई | मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, 22 फेब्रुवारी रोजी विविध तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल ट्रेनचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत होणार असल्याने प्रवाशांनी घराबाहेर पडताना रेल्वेच्या वेळापत्रकाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 11.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या मुलुंड आणि ठाणे दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर कल्याणहून येणाऱ्या अप धीम्या गाड्याही याच स्थानकांदरम्यान जलद मार्गावर धावतील. या बदलामुळे सर्व लोकल फेऱ्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा किमान 10 ते 15 मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही रविवारी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत अप आणि डाऊन दोन्ही मार्ग बंद राहतील. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बेलापूर-पनवेल दरम्यानच्या अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे ट्रान्स-हार्बर मार्गावरही पनवेल ते ठाणे दरम्यानची सेवा विस्कळीत असेल. ठाण्याहून पनवेलकडे जाणारी आणि पनवेलहून ठाण्याकडे जाणारी ट्रान्स-हार्बर सेवा सकाळी 10.01 ते दुपारी 3.53 या वेळेत पूर्णपणे बंद राहील. या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने काही विशेष उपाययोजना केल्या आहेत.

प्रवाशांच्या सुविधेसाठी ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी या दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत. तसेच ठाणे-वाशी-नेरुळ या दरम्यान ट्रान्स-हार्बर लाईनवर मर्यादित लोकल फेऱ्या उपलब्ध असतील. मात्र, गाड्यांच्या फेऱ्या कमी असल्याने स्थानकांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर काही महत्त्वाचे काम असेल तर प्रवाशांनी सकाळी लवकर प्रवास करावा किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा विचार करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. रेल्वे रुळांची देखभाल आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी हा ब्लॉक अत्यंत आवश्यक असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago