सलमान खान गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची आत्महत्या ; आईने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
Salman khan Firing Case Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापन नामक आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या
ANI – 14 एप्रिल च्या पहाटे अभिनेता सलमान खान (Salman KhN) यांच्या घरावर गोळीबार (Firing) करणे झालेल्या नंतर पोलिसांनी आरोपींना अटक केले.अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनुज थापन नामक (Anuj Thapar) आरोपीने पोलिस कोठडीत आत्महत्या (Suiside) केली आहे. आता या प्रकरणी सलमान खानवर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी थापन याच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. Salman khan Firing Latest Update
अनुजच्या कुटुंबाचे वकील रजनी खत्री यांनी सांगितले की, अनुजच्या आईतर्फे मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात सलमान खानविरुद्ध FIR दाखल करण्यासह अनुजच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. अनुजला थर्ड डिग्री टॉर्चर करण्यात आले. त्याने आत्महत्या केली नसून, त्याची पोलिस कोठडीत हत्या झाली आहे. या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेचे अधिकारी स्वतः छोटा शकीलचे साथीदार असल्याचा आरोपही वकिलांनी केला आहे. दरम्यान, गत 14 एप्रिल रोजी सलमानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता.