Sudhir Salvi : लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून मोठे जबाबदारी

•शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सचिव पदी सुधीर साळवी यांचे नियुक्ती
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून अनेक फेरबदल करण्यात येत असून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी महानगर पालिकेच्या दृष्टिकोनातून शिवसेना ठाकरे गटाकडून पक्ष बांधणीत पक्षातील तरुणांना संधी देण्याची रणनिती आहे. राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी आता ठाकरे गटाचे सचिव झाले आहेत. सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिव पदी नियुक्ती झाली आहे. सुधीर साळवी यांची नियुक्ती जाहीर झाली आहे.
सुधीर साळवी यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवडी विधानससभेत ठाकरे गटाकडून सुधीर साळवी इच्छुक होते. मात्र विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच मातोश्रीने संधी दिली होती.
शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पत्रकात काय म्हटलं आहे?
माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिवपदी सुधीर साळवी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. सुधीर साळवी हे लालबागचा राजा सार्वजनिक मंडळात गेल्या 35 वर्षांपासून कार्यकारिणीत आहेत. 20 वर्षांपासून सातत्याने मंडळाचे मानद सचिव म्हणून ते यशस्वी नेतृत्व करत आहेत. तसंच त्यांचं शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातलं योगदान मोठं आहे असं पत्रकात म्हटलं गेलं आहे.
सुधीर साळवी हे सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेले 20 वर्षे मानद सचिव आहेत. तसेच महर्षी दयानंद महाविद्यालय आणि ग्लेनईगल्स हॅास्पिटलचे विश्वस्त म्हणून देखील सुधीर साळवी कार्यरत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुधीर साळवी यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक काही तासांपूर्वी जारी करण्यात आलं आहे.



