Sudhakar Bhalerao Resign : भाजपाच्या माजी आमदाराचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये सामील होणार!
•Sudhakar Bhalerao Resign And Joins NCP माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाला दिले सोडचिठ्ठी, राजीनामा देताना व्यक्त केली खंत
मुंबई :- भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार Sudhakar Bhalerao यांनी आपल्या सदस्यत्वासह भाजपच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी स्वतः भाजपाच्या कार्यालयात भेट देऊन हा राजीनामा दिला आहे. तसेच ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भालेराव यांनी राजीनामा दिल्यानंतर मित्रांना भेटण्यासाठी येत राहील अशी प्रतिक्रिया दिली आहे.
भालेरावांचे वक्तव्य काय?
माझी 30 वर्षांची तपश्चर्या भाजपने वाया घातली, अशा शब्दात भावना व्यक्त करत उदगीर विधानसभा मतदार संघात भाजपच्या तिकीटावर दोन वेळा आमदार राहिलेले सुधाकर भालेराव यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 11 जुलैला म्हणजे आज मुंबई येथील वाय. बी. सेंटर येथे कार्यक्रमात ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे उदगीर विधानसभा मतदार संघात अजित पवार गटाचे आमदार व क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याविरोधात सुधाकर भालेराव यांचे तगडे आव्हान असेल.
लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती साठीराखीव आहे. हा मतदारसंघ शरद पवार यांच्यासाठी नेहमीच जिव्हाळ्याचा मतदारसंघ राहिला आहे. हा मतदार संघराखीव झाल्यानंतर येथून भाजपचे सुधाकर भालेराव सलग दोनवेळा निवडून आले. तरी भालेराव यांना डावलून भाजपने तिथे डॉ. अनिल कांबळे या नवख्या उमेदवारास तिकीट दिले होते. परंतु कांबळे यांचा दारूण पराभव झाला आणि त्या ठिकाणी संजय बनसोडे निवडून आले. संजय बनसोडे हे अजित पवार गटाचे आमदार असून ते सध्या राज्याचे क्रीडा मंत्री आहेत. अजित पवार गटाच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याची शक्यता लक्षात घेत, भालेराव यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.