मुंबई

Subhas Bhoir : कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा हादरा! माजी आमदार सुभाष भोईर यांचा भाजपात जाहीर प्रवेश

Subhas Bhoir Joined BJP : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘कमळ’ हाती; कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या (ठाकरे) अडचणी वाढल्या

कल्याण | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खंदे समर्थक आणि माजी आमदार सुभाष भोईर Subhas Bhoir Joined BJP यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने कल्याण-डोंबिवलीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

निष्ठेचा प्रवास आणि अखेरचा निर्णय

सुभाष भोईर यांनी शिवसेनेच्या पडत्या काळात आणि पक्षात फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटाकडून कल्याण ग्रामीणमधून नशीब आजमावले होते, मात्र त्यात त्यांना अपयश आले. शिवसेनेत असताना वारंवार डावलले गेल्याची भावना आणि 2014 मध्ये उमेदवारी नाकारून रमेश म्हात्रे यांना संधी दिल्याने ते नाराज होते. ही जुनी नाराजी आणि मतदारसंघातील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेता, भोईर यांनी अखेर ‘कमळ’ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपची ताकत वाढली, विरोधक बॅकफूटवर

सुभाष भोईर यांचा कल्याण ग्रामीणमध्ये मोठा जनसंपर्क असून, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे या भागातील आगरी आणि ग्रामीण पट्ट्यात भाजपची ताकत कित्येक पटीने वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “भोईर यांच्या अनुभवाचा भाजपला आगामी महानगरपालिका निवडणुकीत मोठा फायदा होईल. शहराच्या विकासासाठी अनेक दिग्गज नेते भाजपच्या विचारधारेकडे आकर्षित होत आहेत.”

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago