Raigad Nagarparishad Shivsena Vs NCP Radaविकास गोगावले यांच्या समर्थकांकडून जाबरे आणि अंगरक्षकाला मारहाण; ‘रिव्हॉल्व्हर’मुळे वाद चिघळला, महाडमध्ये तणाव
रायगड/महाड :- रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान महायुतीमधीलच दोन गटांमध्ये मोठा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. Raigad Nagarparishad Shivsena Vs NCP Rada शिंदे गटाचे नेते भरत गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये नवे नगर परिसरात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या हाणामारीत भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला जबर मारहाण केल्याची माहिती आहे. तसेच, जाबरे यांच्या समर्थकांच्या अनेक गाड्यांवर दगडफेक करत त्यांची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे सध्या महाड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, महाड पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वादाचे मूळ आणि कारण
निवडणुकीपूर्वी सुशांत जाबरे यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. महाड नगरपरिषदेच्या मतदानावेळी दोन्ही गटाचे समर्थक एका मतदान केंद्रावर जमले होते. याच ठिकाणी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. हा वाद सुरू असताना, जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्व्हर दाखवल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे वादात आणखीनच भर पडली. यानंतर विकास गोगावले रिव्हॉल्व्हर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे सांगितले जात आहे.
तटकरे-गोगावले वादाचा उद्रेक
राज्यात महायुतीचे सरकार असले तरी पालकमंत्रीपदावरून भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद सुरू आहेत. दोघेही एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करत असल्याने हे राजकीय वैर वाढले आहे. आजच्या मतदानाच्या दिवशी याच वैमनस्याचा उद्रेक पाहायला मिळाला.
या घटनेनंतर खासदार सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शांतता राखणे हे आपले कर्तव्य आहे. युवा नेते म्हणवणारे सकाळी मतदान केंद्रात जात आहेत, आर.ओ. (Returning Officer) शी हुज्जत घालतात. मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार केवळ अधिकृत उमेदवार आणि प्रतिनिधीला असतो, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विकास गोगावले यांच्या कृतीवर आक्षेप घेतला.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…