मुंबई

Ambadas Danve : राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निवडणूक आयोगाला पत्र

Ambadas Danve Wrote Letter To Election Commission : अंबादास दानवे यांची राज्य निवडणूक आयोगाकडे या प्रमुख मागण्या

मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve यांनी राज्याच्या निवडणूक आयुक्तांना Election Commission पत्र लिहून मतमोजणीच्या दिवशी अनेक सुविधाच्या मागण्या केल्या आहे. राज्याच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात आणि गैरसोईमुळे मतदारांचे हाल झाले या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्राद्वारे सुख सुविधाच्या मागणी केल्या आहे. Maharashtra Lok Sabha Election Update

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र..

महाराष्ट्रात पाच टप्यात झालेल्या निवडणुक प्रक्रियेदरम्यान राज्यातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. पिण्याची पाण्याची व्यवस्था नसणे, मतदान केंद्रावर सावलीसाठी मंडप नसणे व बुथमध्ये वीज नसल्याने मोठ्या प्रमाणावर उकाडा निर्माण होणे अशा अनेक गैरसोयी झाल्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड नाराजी उद्भवली होती. तर मुंबईत संथ गतीने मतदान होण्यामागे आवश्यक त्या सुविधा नसणे हे सुद्धा एक कारण होते.

तथापि उक्त परिस्थिती लक्षात घेता तसेच उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे मतमोजणी प्रतिनिधीची संख्याही जास्तच राहणार आहे. यामुळे मतमोजणी दिवशी सदरील स्थिती पुन्हा उद्भवू शकते. यामुळे राज्यातील सर्वच मतमोजणी स्थळी उपरोक्त नमूद व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच गैरसोय होऊ नये, म्हणून काळजी घेण्यात यावी.

तरी आपण दिनांक 04 जून, 2024 रोजी होणाऱ्या मतमोजणी दिवशी मतमोजणी स्थळी निवडणूक कर्मचारी व राजकीय पक्ष मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मी आपणांस विनंती करत आहे.

Web Title : State Leader of Opposition Ambadas Danve’s letter to the Election Commission

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0