मुंबई
Trending

ST Employee Strike : अखेर एस.टी महामंडळाचा संप मागे!

ST Employee Strike : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6 हजार 500 रुपयांची वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई :- ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर ST Employee Strike मागे घेण्यात आला मागील दोन दिवसांपासून राज्यभरात एसटी महामंडळाची सेवा पूर्णत: कोलमडली मांडली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेला बैठकीमध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरसकट 6500 रुपयाची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील एसटी महामंडळाचे कर्मचारी विविध मागण्यांकरिता बेमुदत संपावर गेले होते. नंतर परिवहन मंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न काढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीमध्ये एसटी कामगारांच्या मागण्या मान्य केले आहे.

राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही, असे सांगत बैठकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत, एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ६ हजार ५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीच्या महसूल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीविषयी चर्चा करताना राज्य शासनाने सर्वांसाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळाने करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास, निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे आदी विषयांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी कर्मचारी संघटनेचे ॲड. गुणरत्न सदावर्ते, हनुमंत ताठे, संदीप शिंदे, श्रीरंग बरगे आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार गोपीचंद पडळकर हे हि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0