ST Bus Driver Viral Video : “त्या” बस ड्रायव्हरचा व्हिडिओ तुफान व्हायरल
•विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्हिडिओ शेअर करत फडणवीस यांच्यावर केली टीका
मुंबई :- गडचिरोली जिल्ह्यातील अहिरे आगारात एसटी बस ड्रायव्हरचा सध्या व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या एसटी बस ड्रायव्हरला स्टेरिंग वर पोहोचण्याकरिता सर्व सीटच्या वरतून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहे. यवतमाळ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आले होते. आणि त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला या व्हिडिओमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला गेला आहे. ST Bus Driver Viral Video
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय म्हणाले?
अमृतकाल तर फक्त भाजप नेत्यांसाठी,
सामान्य जनतेसाठी तर आजची परिस्थिती ही अन्यायकाल! ST Bus Driver Viral Video
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारात अगोदरच बसेसची कमतरता आहे.
त्यात यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या होणाऱ्या कार्यक्रमासाठी 10 बसेस येथून पाठविण्यात आल्या. या निर्णयाचा फटका मात्र येथील विद्यार्थी, प्रवास करणाऱ्या गर्भवती महिला आणि गोरगरीब प्रवाश्यांना बसत आहे. ST Bus Driver Viral Video