मुंबई

SSC Result 2025 : दहावीचा निकाल जाहीर, यंदा 94.10 % विद्यार्थी झाले उत्तीर्ण!

महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल जाहीर!

मुंबई :- महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्राचा यंदाचा निकाल हा तब्बल 94.10 टक्के इतका लागल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून 9 शिक्षण विभागातून तब्बल 15 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास 14 लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

यंदा दहावीला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या 9 विभागीय मंडळात एकूण 15 लाख 58 हजार 20 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.10 टक्के आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय यंदा एकूण 28 हजार 512 खासदी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28 हजार 20 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 22 हजार 518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

दहावीचा निकाल तुम्ही काही विशिष्ट वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. या वेबसाईट खालीलप्रमाणे आहेत: https://www.mahahsscboard.in/, https://mahresult.nic.in/, https://mahahsscboard.in/ आणि https://sscboardpune.in/ या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल उपलब्ध होतील. या संकेतस्थळावर जाऊन परीक्षार्थी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि विचारलेली माहिती भरून निकाल पाहू शकतात.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

19 hours ago