Shrikar Pardeshi : महाराष्ट्र केडरचे 2001 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई :- राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर श्रीकर परदेशी Shrikar Pardeshi यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीकर परदेशी हे जून 2021 मध्ये पंतप्रधान कार्यालयातून महाराष्ट्रात परतले होते. तेव्हा त्यांच्याकडे सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची नियुक्ती करण्यात आली होती. 2022 मध्ये महाआघाडीचे सरकार कोसळल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तेव्हा श्रीकर परदेशी यांची नियुक्ती फडणवीस यांच्या सचिवपदी करण्यात आली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.परदेशी हे 2001 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत.
श्रीकर परदेशी कोण आहेत?
2001 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेल्या डॉ.श्रीकर परदेशींनी जेथे नियुक्ती होईल तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे. श्रीकर परदेशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील रहिवासी आहेत. श्रीकर परदेशी पेशाने डॉक्टर होते. यांनी एमबीबीएस-एमडी शिक्षण पूर्णकेले असून काही काळ प्रॅक्टिसही केली. 2001 साली यूपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी महाराष्ट्रातून पहिले येण्याची किमया केली होती. श्रीकर परदेशी यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून अनेक जिल्ह्यात काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही त्यांच्या कामाची भुरळ पडली. त्यानंतर 2015 मध्ये त्यांना थेट राजधानी दिल्लीत पीएमओ म्हणजेच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्त करण्यात आलं होतं.पिंपरी चिंचवड आयुक्तपदावर असताना 20 मजली इमारतींचं अतिक्रमण त्यांनी जमीनदोस्त केलं, तेव्हा नागरिकांनी त्यांना बुलडोझर मॅन अशी उपमा दिली होती. त्यांनी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा किताबही पटकावला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…