SRH Vs KKR IPL Final Highlights : कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करून IPL 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. केकेआरने 2014 ला हि ट्रॉफी जिंकली आहे.
IPL :- कोलकाता नाईट रायडर्सने KKR सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा IPL Champion मान मिळविला आहे. प्रथम खेळताना एसआरएचला केवळ 113 धावा करता आल्या. दरवेळेप्रमाणेच सुनील नरेनला एसआरएचविरुद्ध फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र केकेआरच्या इतर फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत हैदराबादने दिलेले लक्ष्य 11व्या षटकातच गाठले. फलंदाजीत व्यंकटेश अय्यर कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला, त्याने अवघ्या 26 चेंडूत 52 धावांची खेळी केली.त्याच्याआधी, आंद्रे रसेलने 3 आणि मिचेल स्टार्कने 2 विकेट घेत केकेआरने तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात, SRH आयपीएलच्या कोणत्याही फायनलमध्ये प्रथम खेळून सर्वात लहान धावा करणारा संघ बनला.
114 धावांचे अत्यंत छोटे लक्ष्य राखण्यासाठी उतरलेल्या केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही कारण सुनील नरेन डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात नरेनची बॅट पुन्हा एकदा शांत राहिली. यानंतर रहमानउल्ला गुरबाज एका बाजूने खंबीरपणे उभा राहिला आणि दुसऱ्या टोकाकडून व्यंकटेश अय्यरने तुफानी शैलीत फलंदाजी केली. गुरबाज आणि अय्यर या जोडीने पॉवरप्ले ओव्हर्समध्येच संघाची धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात 72 धावांपर्यंत नेली.सतत चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता, तर हैदराबादचे गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते. गुरबाज 9व्या षटकात 32 चेंडूत 39 धावा काढून बाद झाला. पण स्कोअरबोर्डवर इतक्या धावा झाल्या होत्या की केकेआरचा विजय निश्चित होता. अखेरीस, 11व्या षटकात तीन एकेरी घेत KKRच्या फलंदाजांनी 8 विकेट राखून विजय निश्चित केला आणि ट्रॉफी जिंकली. SRH Vs KKR IPL Final Highlights
कोलकाता नाईट रायडर्स याआधी २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल चॅम्पियन बनले होते. केकेआरने 2012 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून आणि 2014 मध्ये पंजाब किंग्जचा 3 गडी राखून पराभव करून आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. 2014 नंतर, KKR 2021 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला, परंतु विजेतेपदाच्या लढतीत CSK कडून 27 धावांनी पराभूत झाला. आता अखेर 2014 च्या 10 वर्षांनंतर तिसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे. यासह कोलकाताने आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. SRH Vs KKR IPL Final Highlights
Web Title : SRH Vs KKR : Kolkata champions… beat Hyderabad in the final to win the title; Won the trophy for the third time