SRH Vs DC : सनरायझर्स हैदराबादला पावसाने दिला 440 व्होल्टचा झटका, पॅट कमिन्सचा एसआरएच प्लेऑफमधून बाहेर

SRH VS DC Highlights : SRH आणि DC यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला. पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. आता हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
IPL 2025 :- सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आहे.सामना रद्द झाल्यामुळे पॅट कमिन्सच्या हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. हा संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.या सामन्यात दिल्लीने पहिला खेळ केल्यानंतर फक्त 133 धावा केल्या होत्या, परंतु दुसरा डाव सुरू होण्यापूर्वीच पाऊस सुरू झाला. सुमारे दीड तास पाऊस पडला. त्यानंतर परिस्थिती खेळण्यास योग्य नसल्याने पंचांनी सामना रद्द घोषित केला.
नियमांनुसार, सामना रद्द झाल्यावर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. दिल्लीच्या आशा अजूनही जिवंत आहेत, पण हैदराबादचा प्रवास इथेच संपला.हैदराबादमध्ये रात्री 9.30 च्या सुमारास पाऊस सुरू झाला. पावसामुळे सनरायझर्सचा डाव सुरू होऊ शकला नाही. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी हैदराबादला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणे आवश्यक होते. पण आता एसआरएच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
आतापर्यंत तीन संघ आयपीएल 2025 मधून बाहेर पडले आहेत. हैदराबाद हा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला तिसरा संघ होता.याआधी एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज आणि रियान परागचा राजस्थान रॉयल्सही प्लेऑफमधून बाहेर पडले आहेत. दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यांना 11 सामन्यांत 13 गुण मिळाले आहेत. संघाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली पाचव्या स्थानावर आहे.



