Pune Spa Sex Center : “स्पा सेंटर की वेश्याव्यवसाय केंद्र?” — पुण्यात 18 मुलींची सुटका; परदेशी तरुणींनाही बनवलं होतं ‘शिकार’!

Pune Police Busted Spa Sex Center : विमानतळ व बाणेर परिसरात पोलिसांचा धडक छापा; उच्चभ्रू भागांत चालत होता अनैतिक धंदा
पुणे | शहरातील हाय-प्रोफाईल स्पा सेंटरच्या आड लपलेला एक भयाण वेश्याव्यवसायाचा चेहरा पुणे पोलिसांच्या कारवाईनंतर उघड झाला आहे. बाणेर आणि विमानतळ परिसरात झालेल्या छापेमारीत 18 मुलींची सुटका करण्यात आली असून, त्यात 10 हून अधिक परदेशी मुली आणि दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. Pune Police Latest Crime News
पोलीस तपासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार, ‘किरण ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे’ (वय 28, रा. खराडी) हिने गरिबी आणि विवशतेचा फायदा घेत अनेक तरुणींना स्पा सेंटरमध्ये काम देण्याचे आमिष देऊन देहव्यवसायात ढकलले. यामध्ये 15 आणि 17 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याने प्रकार अधिक गंभीर बनतो.
विमानतळ परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये झालेल्या कारवाईत 16 मुलींची सुटका करण्यात आली, ज्यात 10 परदेशी, 2 भारतीय आणि 4 इतर देशीय नागरिक असल्याचे समोर आले आहे.त्याचवेळी बाणेर येथील स्पा सेंटरमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 मुलींची सुटका झाली. या दोन्ही ठिकाणच्या स्पा मालक, व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी केली. पोलिसांना स्पष्ट संकेत मिळाले होते की ‘मसाज’च्या नावाखाली शरीर विक्रीचा काळा बाजार येथे सुरू आहे. घटनास्थळी धडक देताच अनेक तरुणी भीतीने थरथरत असल्याचे पोलिसांना दिसले.



