Sonia Duhan Joins Congress : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या केंद्रीय नेत्या सोनिया दुहान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
•Sharad Pawar Gat Leader Sonia Duhan Joins Congress Party सोनिया दुहान अजित पवार गटात सामील होण्याच्या चर्चेला पूर्णविराम ! काँग्रेसमध्ये प्रवेश, 2019 च्या अजित पवारांच्या बंडखोरी मध्ये महत्त्वाचे काम
नवी दिल्ली :- विद्यार्थी चळवळीपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत दिल्लीच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अतिशय प्रबळ पणे भूमिका मांडणाऱ्या सोनिया दुहान यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर सोनी आहे अजित पवार गटामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु काँग्रेसच्या प्रवेशानंतर या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.2019 मध्ये अजित पवार यांच्या बंडा नंतर फुटलेले आमदार दिल्लीवरून मुंबईत आणण्यासाठी सोनिया दुहान यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
सोनिया दुहान यांनी मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सोनिया या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. सुप्रिया सुळे यांना केव्हाच आमच्या नेत्या होता आले नाही. आमच्यासाठी शरद पवार हेच नेहमी लीडर राहिले. माझ्या त्यांच्याप्रतीची निष्ठा यापुढेही कायम राहील, असे त्या म्हणाल्या होत्या.
ट्विटद्वारे दिली काँग्रेस प्रवेशाची माहिती
सोनिया दुहान यांनी सकाळी एका ट्विटद्वारे आपल्या काँग्रेस प्रवेशाची माहिती दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, मी आज हरियाणा काँग्रेसचे प्रभारी दीपक बावरिया, प्रदेशाध्यक्ष उदय भान, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा व खासदार दीपेंदर हुड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या एका कार्यक्रमात हरियाणा काँग्रेसमध्ये प्रवेश करेल. सोनिया यांनी अन्य एका ट्विटद्वारेही महिला दुर्गा, कालीमाता, लक्ष्मी व इंदिरा असल्याचे स्पष्ट केले. या पोस्टमध्ये त्या इंदिरा गांधी यांच्या फोटोपुढे बसलेल्या दिसून येत आहेत.
उल्लेखनीय बाब म्हणजे हरियाणात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. या निवडणुकीच्या तोंडावरच सोनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण त्याची पुष्टी अद्याप झाली नाही.
कोण आहेत सोनिया दुहान?
सोनिया हरियाणाच्या हिसारच्या आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव संसार सिंह होते. तर आईचे नाव संतरो देवी आहे. सोनिया 3 भावंडांमध्ये सर्वात मोठ्या आहेत. त्यांचे प्रारंभिक शिक्षण गावातील शाळेतच झाले. हिसारच्या शाळेतून इंटरमीडिएट केल्यानंतर सोनियांनी कुरुक्षेत्र विद्यापीठातून बीएससी केले. बीएससी करून त्या अंबालाला आल्या.त्यानंतर सोनिया पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्याला गेल्या. येथेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वैमानिकाचे प्रशिक्षण घेताना त्यांना आपल्या वडिलांना कर्करोग झाल्याचे समजले. त्यानंतर सोनियांना सर्व काही सोडून घरी परतावे लागले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सोनियांवर आली.