सोलापूरसोलापूर
Trending

Solapur ZP News : मोहिते-पाटील अन् जानकरांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा ‘धडाका’! संस्कृती सातपुतेंनी जीवन जानकरांना चारली धूळ; माळशिरसमध्ये कमळ फुलले

Solapur ZP Latest News : दहिगाव गटात ‘बिग फाईट’मध्ये भाजपची मुसंडी; चार महिन्यांच्या मुलीला घेऊन केलेला प्रचार ठरला निर्णायक

सोलापूर | सोलापूर जिल्हा परिषदेच्या Solapur ZP Election News निकालात आज माळशिरस तालुक्याने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर या दिग्गज जोडगोळीला भाजपने त्यांच्याच घरात मोठा धक्का दिला आहे. दहिगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या संस्कृती राम सातपुते यांनी शरद पवार गटाचे उमेदवार आणि आमदार उत्तमराव जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला.

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

माळशिरसची ही लढत केवळ जिल्हा परिषदेची नसून ती प्रतिष्ठेची लढाई बनली होती. माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या पत्नी संस्कृती यांना मैदानात उतरवले होते. त्यांच्या विरोधात आमदार उत्तमराव जानकर यांनी स्वतःचे पुत्र जीवन जानकर यांना उभे करून मोठे आव्हान दिले होते. मात्र, मतदारांनी संस्कृती सातपुते यांच्या पारड्यात कौल दिल्याने जानकरांच्या मुलाला पराभवाचा सामना करावा लागला.

बाळासह केलेला प्रचार आणि भावनिक साद

निवडणूक काळात संस्कृती सातपुते यांचे काही फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले होते. आपल्या अवघ्या चार महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन त्यांनी भर उन्हात घरोघरी जाऊन प्रचार केला होता. यावरून विरोधकांनी आणि सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकाही केली होती. मात्र, या टिकेला उत्तर देताना राम सातपुते यांनी “तुमची दुश्मनी माझ्याशी आहे, लहान बाळाला कशाला ओढता?” असा भावनिक सवाल विचारला होता. अखेर ही ‘सहानुभूती’ आणि सातपुते यांची रणनीती भाजपच्या पथ्यावर पडली.

मोहिते-पाटलांनाही बसला फटका
केवळ दहिगावच नव्हे, तर माळशिरसमधील इतर गटांतही भाजपची ताकद दिसून आली.

दहिगाव: येथे जिल्हा परिषदेसह दोन्ही पंचायत समिती जागा भाजपने जिंकल्या.

गुरसाळे गण: येथून अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांना पराभवाचा धक्का बसला असून, येथेही भाजपने बाजी मारली आहे.

निकालाचे राजकीय महत्त्व
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी हा निकाल चिंतेचा विषय ठरू शकतो. बालेकिल्ल्यातच भाजपच्या माजी आमदाराने मिळवलेले हे यश आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0