सोलापूर
Trending

Solapur News : “बापाने कष्ट करून मोठी केलेली काँग्रेस पोरीने संपवली!”; सोलापुरातील विजयानंतर जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंवर घणाघाती प्रहार

Solapur Political News : दोन नगरसेवक आलेत ते आधी टिकवा; पालकमंत्र्यांचा खोचक टोला; सोलापूर पालिकेत पराभूतांना ‘स्वीकृत’ची संधी नाकारली

सोलापूर l सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत Solapur BMC Election भाजपने 102 पैकी 87 जागा जिंकत ऐतिहासिक आणि स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आयुष्यभर कष्ट करून जी काँग्रेस मोठी केली, ती संपवण्याचे काम प्रणिती शिंदे यांनी केले आहे,” अशा शब्दांत गोरेंनी हल्लाबोल केला. Solapur Breaking News

प्रणिती शिंदे यांनी जयकुमार गोरे हे एकेकाळी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते, अशी आठवण करून दिल्यानंतर गोरे संतापले. ते म्हणाले, “मी काँग्रेसचा होतो हे सांगण्यासाठी मला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मात्र, शिंदे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांचे आयुष्य घडवले, त्यांचे वाटोळे प्रणिती शिंदे यांनी केले आहे. जेव्हा कार्यकर्त्यांना त्यांची गरज होती, तेव्हा त्या त्यांना वाऱ्यावर सोडून गेल्या. आता केवळ दोन नगरसेवक निवडून आल्यावरही त्या भाजपवर टीका करत आहेत, हे हास्यास्पद आहे.” गल्लीबोळात जाऊन पैसे वाटल्याच्या आरोपाचा समाचार घेताना गोरे म्हणाले की, “दुसऱ्याचा सन्मान करायला शिका, तरच तुमचा सन्मान होईल. लोकसभेला आपण कोणाकोणाशी चर्चा केली होती, हे मला सांगायला लावू नका.”

पराजित उमेदवारांना ‘एन्ट्री’ बंद सोलापूर महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठी चढाओढ सुरू आहे. मात्र, भाजपने या संदर्भात एक मोठा आणि शिस्तबद्ध निर्णय घेतला आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून संधी दिली जाणार नाही, असे शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी स्पष्ट केले आहे. ज्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्षे पदाची अपेक्षा न करता पक्षासाठी त्याग केला आहे आणि ज्यांच्याकडे शहराच्या विकासाचे व्हिजन आहे, अशाच 9 जणांना ही संधी दिली जाणार आहे.

सोलापूर पालिकेचे अंतिम चित्र

भाजप: 87

एमआयएम: 08

शिवसेना (शिंदे): 04

काँग्रेस: 02

राष्ट्रवादी (अजित पवार): 01

शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार): 00

या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचे सोलापुरातील अस्तित्व धोक्यात आले असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही ‘कमळ’ फुलवण्याचा निर्धार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. सांगोल्यात शहाजीबापू पाटील यांच्याशी युती करण्याबाबत त्यांनी सकारात्मक संकेत दिले असले, तरी शेकापबाबतची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0