Solapur News : प्रयागराज कुंभात स्नान केल्यानंतर हृदयविकाराचा झटका, सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे निधन
Solapur Mahapour Mahesh Kothe Death : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांचे कुंभमेळ्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
सोलापूर :- शरद पवार Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्रातील नेते आणि सोलापूर महापालिकेचे माजी महापौर महेश कोठे Mahesh Kothe यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. महेश कोठे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर सोलापूरचे वातावरण शोकाकुल झाले आहे.थंडीत रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात आहे. महेश कोठे हे त्यांच्या काही मित्रांसह कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
महेश कोठे हे कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले होते. त्यांनी गंगा नदीत शाही स्नान केले, त्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
महेश कोठे हे विष्णुपंत कोठे यांचे मित्र होते. विष्णुपंत कोठे आणि महेश कोठे हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर विश्वासू मानले जात होते. सोलापुरात काँग्रेस मजबूत करण्यात आणि सोलापूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यात कोठे कुटुंबाची भूमिका महत्त्वाची होती.
महेश कोठे यांनी काँग्रेस पक्ष ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ते शरद पवार यांच्या पक्षापर्यंतचा प्रवास केला. महेश कोठे यांच्या अकाली निधनाने सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.