Sharad Pawar On Maharashtra Farmers : ‘हे अभूतपूर्व संकट, केंद्र-राज्य सरकारने तात्काळ मदत करावी’; शरद पवारांनी केली विशेष मदतीची मागणी
मुंबई :- राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः ज्या भागांत पावसाची नेहमीच कमतरता असते, त्याच सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, परभणी आणि दक्षिण अहमदनगरसारख्या जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. या अभूतपूर्व परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारला केवळ पीक नुकसानीचेच नव्हे, तर जमीन वाहून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करण्याची आणि तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे.
पिकांचे अतोनात नुकसान
या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि अन्य पिकांची वाढ झाली, पण त्यानंतर सलग पाच दिवस शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून पीक पूर्णपणे गेले असून, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. ‘आपण दुष्काळ पाहिला, पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नाही,’ असे म्हणत त्यांनी या परिस्थितीची तीव्रता अधोरेखित केली.
‘पंचनामे वास्तवानुसार करा’
अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी आहे, असे पवार म्हणाले. केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निवारण योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने वेगाने आणि वास्तववादी पंचनामे करावेत अशी मागणी त्यांनी केली. ‘पंचनामे करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे आणि पिकांची पाहणी करूनच अहवाल तयार करावा,’ असेही त्यांनी सांगितले.
जमिनीच्या नुकसानीचीही भरपाई हवी
यावेळी त्यांनी केवळ पीक नुकसानीवर भर न देता जमिनीच्या नुकसानीचीही भरपाई देण्याची मागणी केली. ‘पीक वाया गेले तर फक्त त्या वर्षाचे नुकसान होते, पण जमिनीची माती वाहून गेली तर त्यातून उत्पादन घेण्याचा मार्ग कायमचा बंद होतो,’ असे सांगत त्यांनी जमिनीच्या नुकसानीची भरपाई देण्याचे महत्त्व पटवून दिले. यासोबतच, वाहून गेलेली गुरेढोरे आणि उद्ध्वस्त झालेल्या पाणंद रस्त्यांसाठीही तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…