पुणे

Social Media Star Nirmla Navle : सोशल मीडिया स्टार निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का! कारेगाव गणात ‘रिल्स’ची जादू ओसरली; भाजपच्या मनीषा पाचंगेंचा विजय

Pune Shirur ZP Election News: अतिशय चुरशीच्या लढतीत 300 मतांनी पत्करावी लागली हार; ‘इन्स्टाग्राम’वरील लोकप्रियतेपेक्षा भाजपची रणनीती ठरली सरस

शिरूर/पुणे | पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावरील लोकप्रिय व्यक्तिमत्व निर्मला नवले यांना शिरूर पंचायत समितीच्या निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. कारेगाव-कान्हूर मेसाई गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार असलेल्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी सुमारे 300 मतांच्या फरकाने पराभव केला. सोशल मीडियावर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या नवलेंचा हा पराभव सध्या पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकप्रियता विरुद्ध प्रत्यक्ष राजकारण

आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले यांनी काही वर्षांपूर्वी कारेगावच्या सरपंचपदाची धुरा सांभाळली होती. सरपंच असताना त्यांनी केलेली विकासकामे आणि सोशल मीडियावर त्यांच्या ‘रिल्स’मुळे त्या राज्यभर प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या वक्तव्यांची आणि स्टाईलची नेहमीच चर्चा असायची. मात्र, पंचायत समितीच्या या मोठ्या निवडणुकीत केवळ सोशल मीडियावरील लोकप्रियता त्यांना तारू शकली नाही. भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी स्थानिक प्रश्नांवर भर देत आणि भाजपच्या संघटनात्मक शक्तीच्या जोरावर नवलेंच्या लोकप्रियतेवर मात केली.

पुणे जिल्हा परिषदेतील सद्यस्थिती

निर्मला नवले यांचा पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असला, तरी पुणे जिल्ह्यात इतर ठिकाणी पक्षाला ‘सहानुभूती’ मिळताना दिसत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात प्रचार थंडावला होता, मात्र आतापर्यंत हाती आलेल्या 73 जागांच्या कलानुसार

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): 27 जागांवर आघाडी/विजय

भारतीय जनता पक्ष (भाजप): 20

जागांवर आघाडी/विजय

शिवसेना (शिंदे गट): 07 जागा

शिवसेना (ठाकरे गट): 02 जागा

राष्ट्रवादी (शरद पवार गट): 03 जागा

अजितदादांच्या निधनाचा परिणाम
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कोणतीही मोठी सभा झाली नव्हती. कार्यकर्त्यांमध्ये काहीसे नैराश्य असूनही, ग्रामीण भागात राष्ट्रवादीला सहानुभूतीचे मतदान होताना दिसत आहे. असे असतानाही, निर्मला नवले यांच्यासारख्या तगड्या आणि लोकप्रिय उमेदवाराचा पराभव होणे हे राष्ट्रवादीसाठी चिंतन करायला लावणारे आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago