महाराष्ट्र
Trending

Smriti Mandhana’s Father Suffers Heart Attack : नियतीचा खेळ! लग्नाच्या एक दिवस आधी स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका!

Smriti Mandhana’s Father Suffers Heart Attack : भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे लग्न ऐनवेळी रद्द; वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून कुटुंबीयांकडून प्रार्थना!

सांगली :- भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाहसोहळा 23 नोव्हेंबर रोजी अत्यंत उत्साहात पार पडणार होता. Smriti Mandhana’s Father Suffers Heart Attack मंडप सजला होता, दोन्ही कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज होते, पण नियतीने अगदी शेवटच्या क्षणी एक अनपेक्षित आणि हृदय पिळवटून टाकणारे वळण दिले. स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची लग्नाच्या एक दिवस आधी अचानक तब्येत बिघडली, ज्यामुळे विवाह सोहळा तत्काळ पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेण्यात आला.

आनंदावर विरजन
श्रीनिवास मानधना हे आदल्या दिवसापर्यंत आपल्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत आनंदाने व्यस्त होते. मात्र, त्यांना रात्री उशिरा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात हलवले आणि मोठा आनंद सोडून कुटुंबावर चिंतेचे ढग दाटले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व जण त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, श्रीनिवास मानधना यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर भावनिकरित्या व्हायरल होत आहेत. ‘कुड़माई’ या गाण्यावरचा मायेचा परफॉर्मन्स, ‘ना रे ना रे’ या गाण्यावरचा डान्स आणि खुद्द स्मृतीसोबत त्यांनी केलेला डान्स… हे क्षण पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद स्पष्ट दिसतो. अशा आनंदी क्षणांमध्ये असलेल्या व्यक्तीची क्षणात तब्येत बिघडली, याची कल्पनाही कुणाला आली नसेल.

डॉक्टरांनी दिली माहिती
श्रीनिवास मानधना यांच्या तब्येतीबाबत सांगलीतील सर्वहित हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. नमन शाह यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “रात्री सुमारे 11.30 वाजता श्रीनिवास मानधना यांना डाव्या बाजूला तीव्र छातीत वेदना जाणवल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसू लागली. त्यांच्या कार्डिॲक एन्झाईम्समध्ये किंचित वाढ दिसून आली आहे, त्यामुळे त्यांच्यावर सतत निरीक्षण ठेवणे गरजेचे आहे.”

डॉ. शाह पुढे म्हणाले, “त्यांना सतत ECG मॉनिटरिंगची आवश्यकता आहे आणि गरज पडल्यास एंजिओग्राफी करावी लागू शकते. त्यांचा रक्तदाब सध्या थोडा वाढलेला आहे. लग्नसमारंभाची तयारी, धावपळ आणि सीझनचा प्रचंड ताण याचाही त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असू शकतो.”

मानधना कुटुंबीय आणि क्रिकेटप्रेमी आता श्रीनिवास मानधना यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0