Smriti Irani : भाजपा नेत्या स्मृती इराणी यांचे काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बद्दल मोठे वक्तव्य
•राहुल गांधी यांचे राजकारण बदललं आहे…. स्मृती इराणी
ANI :- भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखती दरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा करताना लोकसभेचे विरोधी पक्ष नेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, आता राहुल गांधींचं राजकारण बदललं आहे. ते एक वेगळे राजकारण करत आहे. तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण ही वेगळी गोष्ट आहे. असं स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी संसदेत टी-शर्ट घातला आहे. पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टने तरुण पिढीला काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे, हे त्यांना माहीत आहे. आपण गैरसमजात राहू नये. त्यांनी उचललेलं पाऊल तुम्हाला योग्य वाटेल किंवा अयोग्य वाटेल पण ते वेगळं राजकारण करत आहेत.”
उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. “आता राहुल गांधींचं राजकारण बदललं आहे. ते एक वेगळं राजकारण करत आहेत. तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण ही वेगळी गोष्ट आहे” असं स्मृती यांनी म्हटलं आहे
स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये राहुल गांधी यांचा अमेठीतून पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी अनेकदा राहुल गांधी आणि गांधी कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने 2024 च्या निवडणुकीत या पराभवाचा बदला घेतला आणि स्मृती इराणी यांचा पराभव केला. अमेठीमध्ये किशोरी लाल शर्मा यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला आहे.