मुंबई

Sion MTNL Cable News : सायनमध्ये एमटीएनएलच्या केबलचोरांची टोळी जेरबंद, 14 आरोपींना अटक

  • पहाटेच्या अंधारात जेसीबीने केबल काढताना पोलिसांच्या जाळ्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

मुंबई :- मुंबईच्या सायन परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इथे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) ची लाखो रुपयांची भूमिगत कॉपर केबल चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. शिव पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत या टोळीतील 14 आरोपींना रंगेहाथ अटक केली असून, चोरीसाठी वापरलेला एक जेसीबी (JCB) देखील जप्त करण्यात आला आहे.

ही थरारक घटना 15 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे संपूर्ण शहर शांत असताना, रोड नंबर 29, डाल्डा कंपनीसमोर काहीतरी संशयास्पद घडत असल्याची माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती जेसीबीचा वापर करून एमटीएनएलची मौल्यवान केबल बाहेर काढत होते.

माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे आणि पोलीस उपनिरीक्षक किरण भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच आरोपींचा गोंधळ उडाला. पोलिसांनी त्यांना जागीच पकडले आणि त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे कामाची कोणतीही अधिकृत परवानगी किंवा ओळखपत्र नव्हते. अधिक तपास केला असता, ते केबल चोरी करत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी तातडीने एमटीएनएलच्या वडाळा कार्यालयाचे व्यवस्थापक विनोद रामदारा नगराळे यांना बोलावले. त्यांच्या तक्रारीवरून शिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अटक केलेल्या 14 आरोपींमध्ये निरज विजय सराफ (वय 30), वेलु करुणा कुंदर (वय 42), दिनेश दिगंबर मोकल (वय 39), यश प्रवीण घोरड (वय 25), संतोष अनंत दळवी (वय 38), आकाश शंकर धोतरे (वय 22), अमन अवधेश चौधरी (वय 21), विकम केशरी रघुवीर प्रसाद अग्रवाल (वय 42), संजयकुमार भोला गौंड (वय 29), नितीन उमाजी गजाभरे (वय 30), सचिन बाबु दासर (वय 24), निखिल गंगाधर बाविस्कर (वय 23), महेश सुधाकर कुलात (वय 26) आणि मिराज यासीन मन्सुरी (वय 32) यांचा समावेश आहे.

या कारवाईचे कौतुक पोलीस आयुक्त देवेन भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने आणि पोलीस उपायुक्त रागसुधा आर. यांनी केले आहे. या कामगिरीत पोलीस शिपाई जाधव, पाटील, डबडे आणि बोरगे यांचाही महत्त्वाचा सहभाग होता. या टोळीचा आणखी काही ठिकाणी सहभाग आहे का, याचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0