Singer Dinkar Shinde Death : सुप्रसिद्ध गायक शिंदेशाही घराण्यातील आनंद शिंदे यांचे धाकटे बंधू दिनकर शिंदे यांचे निधन
मुंबई :- भीम गीते, लोकगीते, मराठी संगीत क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचे ओळख असलेले शिंदे कुटुंबातील एक स्वर हरपला आहे.आपल्या गायकीने चाहत्यांचं मनोरंजन करणाऱ्या या शिंदे घराण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिंदे घराण्यातील प्रतिष्ठित व्यक्तीचं निधन झालं आहे. Singer Dinkar Shinde Death आनंद शिंदे यांच्या धाकट्या भावाचं निधन झालं आहे. आनंद शिंदे यांनी त्यांच्या लोकगीताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आदर्श आणि उत्कर्ष यांनीही त्यांचा शिंदेशाही बाणा जपला. आदर्श आणि उत्कर्ष दोघेही उत्तम गायक आहेत.
उत्कर्षने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी शेअर केली.उत्कर्ष शिंदेचे काका आणि गायक आनंद शिंदे यांचे भाऊ दिनकर पल्हाद शिंदे यांचं निधन झालंय. बुधवारी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला. उत्कर्षने इन्स्टाग्रामवर त्यांच्याविषयी भावूक पोस्ट शेअर केलीय.
गायक-दिनकर प्रल्हाद शिंदे) महागायक प्रल्हाद शिंदेचे लहान चिरंजीव, आनंद मिलिंद शिंदेंचे (दिनू) धाकटे भाऊ आणि विजयाआनंद शिंदे चे नात्याने जरी दीर तरीही मनात स्थान मात्र पहिल्या मुलाचे. हर्षद उत्कर्ष आदर्श चे दिनू नाना. काका कमी पण दोस्त जास्त. नेहमी हसरा चेहरा, फुल ऑन एनर्जी, मस्त कलंदराच आयुष जगलेला एक मस्त कलाकार. मी नेहमी विजया आनंद शिंदे म्हणजे माझ्या मम्मीच्या तोंडून ह्या सर्वांचे लहान पनीचे किस्से ऐकले. कसे हे सर्व मंगळवेढे गावात एकाच वाडीत समोर रहाचे, एकाच शाळेत शिकायचे. लहान पण कसएकत्र गेल. कसं लहान पणीच मम्मी पप्पाच लग्न झाल. गावातून कल्याण चा प्रवास कसा झाला. गरिबी घरात होती पण ही लहान लहान मुलं किती पटापट जबाबदारीची जाण ठेवत अवेळी मोठी झाली. कसा शिंदेघराण्याचा डोलारा खांद्यावर एक एक जण घेऊ लागला. मोठा भाऊ म्हणजेबापच आणि वहिनी म्हणजे आई. हे तुमच्या कडून शिकलो दिनू नाना. भावाभावा ने अजन्म एकत्रित कसं रहायचं ते तुमच्या कडून शिकलो. आज जेव्हा मी माझ्या पुतण्याना आल्हाद हर्षद शिंदे, अंतरा आदर्श शिंदे., आलाप हर्षद शिंदे ह्यांना खाद्यावर घेऊन मस्ती करतो तेव्हा आठवण येते तुम्हा सर्व काका लोकांची. कारण आम्हाला ही तुम्ही असेच खांद्यांवर घेऊन वाढवलत. तुम्ही ही शिकवण दिलीत पुतणे म्हणजे मित्र आपली मुलच. म्हणून आज आल्हाद मला नाना काका नाही तर मला भाई म्हणतो. शिंदेघराण्याने काय कमवल असेल तर ते असतील नाती माणसे मित्र परिवार आणि प्रेक्षकवर्ग. मागच्या वर्षी आपला सार्थक आपल्याला सोडून गेला त्याच्या जाण्याचे दुःख तुम्ही पचवू शकला नाहीत. एका पित्याला हे दुःख पचविणे तसे अशक्यच. तरीही तुम्ही स्वतःशी ही झुंज दिलित नेहमी तुमच्या चेहऱ्यावर दिसलेली ऊर्जा, हास्य आम्हाला आयुषाला भिडण्याची कला शिकवून गेला.. भावाभावातल प्रेम. स्टेजवर तुम्ही एंट्री केली की वेगळाच कॉन्फिडन्स हे सगळं आम्ही मिस करू. तुम्हा सर्वांना च्या संस्कारा मुळेच आज हर्षद आदर्श उत्कर्ष एकत्रित एकमेकांची ताकत बनून सोबत राहून पुढे ही असेच शिंदेघराण्याचा वट्टवृक्ष आणखीन जास्त भव्य समरुद्ध करू. तुम्ही आम्हाला सोडून गेलात ही वार्ता कळाली आणि तुमच्या सोबत घालविलेले लहानपणा पासून ते आतापर्यंतचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला. दिनू नाना वि विल मिस यू.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…