महाराष्ट्र

Sindhudurga ACB Trap : सिंधुदुर्गात एसीबीचा मोठा दणका! मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या अनुदानासाठी लाच घेणारा ‘उद्योग निरीक्षक’ जाळ्यात

Sindhudurga ACB Trap News : 26 लाखांच्या कर्जावर मागितली होती 1 टक्का लाच; पेट्रोल पंपाजवळ 22 हजारांची रोकड स्वीकारताना रंगेहात अटक

सिंधुदुर्ग | नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच, सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध जोरदार मोहीम राबवली आहे. जिल्हा उद्योग केंद्र, ओरोस येथील उद्योग निरीक्षक पंकज विठ्ठल शेळके (31 वय) याला 22 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एच.पी. पोलीस पेट्रोल पंपाजवळ रंगेहात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदाराने ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा’ (CMEGP) अंतर्गत नवीन आयशर ट्रक खरेदी करण्यासाठी 26 लाख रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव सादर केला होता. या मंजूर कर्जाच्या रकमेवर शासनाचे 35 टक्के अनुदान मिळते. हे अनुदान मंजूर करून देण्यासाठी आरोपी लोकसेवक पंकज शेळके याने एकूण कर्ज रकमेच्या 1 टक्का, म्हणजेच 26 हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती.

एसीबीचा सापळा आणि रंगेहात अटक

तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने सिंधुदुर्ग एसीबीकडे धाव घेतली. 31 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत आरोपीने तडजोडीअंती 22 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार, ओरोस येथील एच.पी. पोलीस पेट्रोल पंपाजवळ सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 22 हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने शेळके याला पंचासमक्ष रंगेहात पकडले.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

आरोपी पंकज शेळके याच्याविरुद्ध सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (संशोधन 2018) चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-अधीक्षक विजय पांचाळ, पोलीस निरीक्षक दीपक माळी आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

43 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago