सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : मळगाव (ता. सावंतवाडी) येथील ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव सिताराम चव्हाण (वय ५१ वर्षे) यांना ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. २२ ऑगस्ट २०२५) सावंतवाडी येथील रेणुका हॉटेलमध्ये करण्यात आली.
प्रकरणाची पार्श्वभूमी
तक्रारदाराच्या मळगाव-रस्तावाडी येथील वृक्षवल्ली गृहनिर्माण प्रोजेक्टमधील १२ ग्राहकांची घरपत्रके बदल करून देण्यासाठी आरोपी चव्हाण यांनी सुरुवातीला ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. पडताळणीदरम्यान तडजोडीअंती ४० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
सापळा कारवाई
२२ ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडून आरोपीने रेणुका हॉटेल, सावंतवाडी येथे ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सिंधुदुर्ग युनिटने पंचासमक्ष त्याला अटक केली.
कारवाईत सहभागी अधिकारी
ही कारवाई एसीबी ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील व अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एसीबी सिंधुदुर्ग युनिटचे पोलीस निरीक्षक दिपक माळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गुन्हा दाखल
आरोपीविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (संशोधित २०१८) अंतर्गत कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सार्वजनिक आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एजंट जर शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाच मागत असल्यास नागरिकांनी त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिवराज पाटील (एसीबी, ठाणे परिक्षेत्र) यांनी केले आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…